तुमच्या बाळाला हे करताना त्याला रागवू नका!
या संशोधनावेळी ३१% मुले अंगठा चोकत असल्याचे आढळले. तर १३ वर्षाच्या मुलांमधील ४५% मुलांमध्ये एटॉपिक सिंड्रोमची लक्षणे दिसून आली. पण ज्या मुलांमध्ये तोंडाचे विकार होते, त्यामध्ये ४०% मुलांनमध्ये सिंड्रोम होता. तर ज्या मुलांना अंगठा चोकणे, किंवा नखे कुरतडण्याची सवय आहे. त्यामधील ३१% मुलांनाचा हा रोग होता.
या संशोधनात ५,७,९ आणि ११ वर्षीय अशा न्यूझीलंडमधील एकूण एक हजार मुलांवर हे अध्ययन करण्यात आले. ज्यात मुलांच्या सवयींवर विशेष लक्ष दिले होते. तसेच यावेळी १३ ते ३२ वर्षीय व्यक्तींसाठी त्वचा विकारांवरही अध्ययन करण्यात आले.
पण हे संशोधन मुलांच्या या सवयी योग्य असल्याचे प्रमाणपत्र देत नाही. मात्र, यातील सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधून घेते. यामुळे प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होण्यासोबतच हायपर अॅलर्जीपासून वाचण्याची क्षमता वाढते, असे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनात लहान मुलांना अंगठा चोखणे, किंवा नखे कुरतडणे आदी सवयींमुळे त्याची कोणत्याही अॅलर्जीशी सामना करण्याची शक्ती वाढते. उदा. धुलीकण, गवत, मांजर, कुत्रे, घोडे किंवा हवेतून संसर्ग पावणाऱ्या जंतुंपासून प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.
तुमच्या बाळाला अंगठा चोकणे, किंवा नखे कुरतडण्याची सवय आहे का? जर याचे उत्तर होकारार्थी असेल, तर तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. यामुळे तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती वाढते.
कॅनेडामध्ये करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये मुलांच्या या सवयींमुळे लहान मुलांमधील संसर्गजन्य आजारांच्या संख्येत घट होत असल्याचे आढळले.