जंगलच्या राजा-राणीचं अनोखं लग्न, 400 पाहुण्यांची हजेरी

बांग्लादेशमधील एका प्राणी संग्रहालयातील कर्माचाऱ्यांनी सिंह-सिंहीणीच्या लग्नासाठी हृदयाच्या आकाराचं मांस असलेलं केक तयार करण्यात आला होता. हा सगळा खटाटोप जास्तीत लोकांना आकर्षित करण्यासाठी आमि प्राण्यांच्या प्रजननासाठी चांगलं वातावरण निर्माण व्हावं यासाठी करण्यात आला.
प्राणी संग्रहालयाचे डेप्युटी क्युरेटर मंजूर मुर्शीद म्हणाले की, या सिंह-सिंहीणच्या लग्नाआधी देखील लहान मुलांना पार्टी देण्यात आली होती.
येथील अधिकारी मिसबाह उद्दीननं सांगितलं की, हा फार वेगळा समारंभ होता. सिंह-सिंहीणच्या मिलनासाठी आम्ही प्राणी उद्यानाला एक वेगळा लूक दिला होता.
चिटगावमधील प्राणी उद्यानात बुधवारी सिंहीण नोवा आणि सिंह नभ यांच्या रिसेप्शनला जवळजवळ 400 अतिथी उपस्थित होते.