सोशल मीडियाचा वापर करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
आपल्या खासगी प्रोफाइलपासून व्यावसायिक जगतातील लोकांना दूर ठेवा.
सध्या सोशल मीडियावर चेक-इन ही एक नवी क्रेझ आली आहे. त्यामुळे तुम्ही आता कुठे आहात हे सहजपणे कुणालाही कळू शकतं. त्यामुळे ते तुमच्यासाठी धोकादायकही ठरु शकतं.
फेसबुक हे माध्यम फारच व्यापक आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट शेअर करताना एकदा विचार करा की, आपल्या या पोस्टचा इतरांवर काय परिणाम होईल.
फेसबुक हे माध्यम फारच व्यापक आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट शेअर करताना एकदा विचार करा की, आपल्या या पोस्टचा इतरांवर काय परिणाम होईल.
असा कोणताही फोटो शेअर करु नका ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास होईल. त्यामुळे आपले फोटो शेअर करताना थोडासा विचार करा.
सोशल मीडियाचा सध्या आपण अगदी सहजपणे वापर करतो. अनेकदा आपण काही गोष्टी नकळत शेअरही करतो. पण कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात किंवा करु नये हे नक्की जाणून घ्या.