उदयनराजेंसह या सहा जणांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन
मुंबईसह महाराष्ट्रात येत्या 24 डिसेंबरला अवघी शिवसृष्टी अवतरणार आहे. मुंबईतल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं मेगा प्लॅन तयार केलाय. उद्घाटन 24 डिसेंबरला असलं तरी 23 तारखेपासूनच म्हणजेच उद्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूमीपूजन आणि जलपूजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरबी समुद्रात जातील.
या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून सर्व छत्रपती घराण्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसलेही भूमीपूजनाला हजर असतील.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही कार्यक्रमाला उपस्थित असतील.
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत.
तसंच खासदार संभाजी राजे छत्रपतीही भूमीपूजनाला उपस्थित असतील.
राज्यपाल सी विद्यासागर रावही कार्यक्रमाला उपस्थित असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -