अरिजीतच नाही या प्रसिद्ध गायकांशीही सलमानचं बिनसलं होतं!
हिमेश रेशमियासोबत वाद: एका चॅनलवरील शोमध्ये सलमाननं हिमेश रेशमियाच्या नाकातून गाण्याची स्टाइल आणि त्याच्या सुरांची बरीच टिंगल केली होती. त्यानंतर हिमेश खूपच नाराज झाला होता. यावेळी सलमान म्हणाला होता की, हिमेशला सुरांची अजिबात जाण नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appए. आर. रहमानसोबत वाद: एका कार्यक्रमादरम्यान ए. आर. रहमान आणि सलमान स्टेजवर उपस्थित होते. तेव्हा सलमाननं रहमान हा एक साधारण गायक असल्याचं सर्वांसमोर म्हटलं होतं. सलमानच्या या वक्तव्यानंतर रहमानने सलमानशी हातही मिळविला नव्हता. त्यावेळी सलमाननं त्याला असंही विचारलं होतं की, त्याच्या सिनेमासाठी कधी संगीत देणार? त्यावेळी रहमान म्हणाला की, जर सिनेमा आवडला तरच त्यासाठी संगीत देईन.
सोनू निगमशीही वाद: मागील एका वर्षापूर्वी एका इव्हेंटमध्ये सलमाननं गायक सोनू निगमवर टिप्पणी करत म्हटलं होतं की, त्याला कोणत्याही गायकाची गरज नाही. दुसऱ्यांपेक्षा चांगलं गाऊ शकतो. या वक्तव्यावर सोनू निगम बराच नाराज झाला होता. पण असं काही झालं नसल्याचं नंतर सोनू निगमनं ट्वीट केलं होतं.
अरिजीतनं माफी मागितली: अरिजीतनं नुकतंच फेसबुकवरुन सलमानची माफी मागितली. सुलतान सिनेमातून आपलं गाणं हटवू नये अशी विनंतीही त्याने केली आहे.
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने बॉलिवूडचा दबंग सलमान खानची थेट सोशल मीडियावरुन माफी मागत सगळ्यांना धक्का दिला आहे. पण असं पहिल्यांदा झालेलं नाही की, कोणत्या गायकासोबत सलमानाचा वाद झाला आहे. याआधीही सलमानचं हिमेश रेशमिया, सोनू निगम आणि ए. आर. रहमान यांच्यासोबत वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -