या नोकऱ्यांमध्ये आहे सर्वाधिक कमाई...
डेटा अॅनालिटिक्स मॅनेजर: 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या डेटा अॅनालिटिक्स मॅनेजरला 40 ते 60 लाख रुपयेही मिळतात. डेटा अॅनालिटिक्स मॅनेजर हा कोणत्याही कंपनीचा डेटा योग्य पद्धतीनं मॅनेज करुन बिजनेस वाढविण्यात मोठं योगदान देतो.
प्रोडक्ट मॅनेजर: 4 ते 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या प्रोडक्ट मॅनेजरला 15 लाख ते 40 लाखापर्यंत पगार मिळू शकतो. सध्या अनेक कंपन्यांमध्ये प्रोडक्ट मॅनेजरची मागणी वाढते आहे.
मोबाइल डेव्हलपर्स: आज सगळ्याच्या निकडीचा झालेला मोबाइलनं नोकरीचेही दरवाजे खुले केले आहेत. जे मोबाइल डेव्हलपर्संना 4 ते 5 वर्षापर्यंतचा अनुभव असतो. त्यांना जवळजवळ 60 लाखापर्यंत पगार मिळण्याची शक्यता असते. चांगल्या टेक्नोलॉजी कंपन्या 50 ते 60 लाखापर्यंत पॅकेज ऑफर करतं. सध्या भारतात मोबाइल डेव्हलपर्सची बरीच मागणी वाढत आहे.
सॉल्युशन आर्किटेक्ट: एका चांगल्या सॉल्युशन ऑर्किटेक्टला 80 लाखापर्यंत पगार मिळतो. सॉल्युशन आर्किटेक्ट हा गरजेप्रमाणे प्लॅनिंग करतो. त्याचा कंपनीच्या वाढीमध्ये मोठा हात असतो. भारतात टेक्नोलॉजीमध्ये डिल करणाऱ्या जवळजवळ सगळ्याच कंपनीमध्ये सॉल्युशन ऑर्किटेक्टची गरज असते.
डेटा सायंटिस्ट: जर तुम्ही एका डेटा सायंटिस्ट असाल आणि तुम्हाला अनुभव देखील चांगला असेल तर तुम्हाला तब्बल 75 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. 5 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्हाला एवढा पगार निश्चितच मिळू शकेल. भारतात पुढील 3 वर्षात 2 लाख डेटा सायंटिस्टची गरज लागणार आहे. तर अमेरिकेतही डेटा सायंटिस्टसाठी तब्बल 1.5 लाख डॉलर पॅकेज दिलं जातं.
देशभरात नोकरीबाबत युवकांची पहिली पसंती इंजिनिअरिंग अथवा डॉक्टर किंवा आयटी क्षेत्रासाठी असते. पण याशिवाय देखील अशा अनेक नोकऱ्या आहेत की, ज्यामध्ये तुम्ही चांगली कमाई करु शकता. पाहा कोणत्या आहेत अशा नोकऱ्या...