खेळाच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात आलेले खेळाडू
मॅरट सफीनः जगप्रसिद्ध टेनिसपटू मॅरिट सफीनने 2011 साली निवृत्तीनंतर राजकारणात पाऊल ठेवलं. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी सफीनला खासदारकी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहम्मद अझरुद्दीनः भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी मैदानातील इनिंग नंतर 2009 साली राजकारणाच्या मैदानावर नवीन इनिंग सुरु केली. अझरुद्दीन 2009 साली मुरादाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
इम्रान खानः पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खानने निवृत्तीनंतर समाज कार्य सुरु केलं. त्यानंतर पाकिस्तानच्या तहरीक-ई-इन्साफ या पक्षात प्रवेश केला.
एरिक कँटोनाः प्रसिद्ध फुटबॉलपटू एरिक कँटोनाने निवृत्तीनंतर सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. लोकप्रियतेच्या या विश्वातून कँटोना यांनी 2012 साली पुन्हा राजकारणात प्रवेश केला.
नवज्योत सिंह सिद्धूः भाजपने शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्धूप्रमाणेच अनेक खेळाडूंनी मैदानातील इनिंगनंतर राजकीय इनिंगला सुरुवात केली.
सचिन तेंडुलकरः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 27 एप्रिल 2012 साली राज्यसभेचा खासदार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. सचिनला काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी दिली.
सनथ जयसूर्याः श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याने 2010 साली निवडणुकीत विजय मिळवून खासदारकी मिळवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -