राज ठाकरेंच्या इशाऱ्यामुळे 'या' पाकिस्तानी कलाकारांवर दडपण
नुसरत फतेह अली खान आपल्या सुफी संगीतामुळे भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन पाकिस्तानी कालाकारांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. “मुंबईत असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी पुढील 48 तासात मुंबई सोडून पाकिस्तानात जावं, अन्यथा त्यांचं शुटिंग चालू देणार नाही. त्यांनी तातडीने भारत न सोडल्यास, आम्ही शुटिंग सुरु असलेल्या ठिकाणी घुसून त्यांना आमच्या पद्धतीने पळवून लावू,'' असा इशारा त्यांनी दिला आहे.
उरी हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला असताना, इकडे मुंबईतही पाकिस्तानविरोधातील रोष वाढत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.
मनसेच्या इशाऱ्यामुळे कोणकोणत्या कलाकारांवर दडपण आहे, याची काही नावे सांगणार आहोत. या यादीत पहिले नाव पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांचे आहे. गुलाम अली भारतात अतिशय लोकप्रिय आहेत.
फहाद खानने भारतीय टीव्ही मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले घर बनवलं आहे.
अनेक रोमॅटिंक गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला अतिफ अली असलम भारतात लोकप्रिय आहे.
अली जफर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला.
अभिनेत्री माहेरा खान लवकरच शाहरुखच्या आगामी रईस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -