श्रीदेवीप्रमाणे 'या' सेलिब्रिटींचाही बाथटबमध्ये बुडून मृत्यू!
श्रीदेवीचा मृत्यू हा बाथटबमध्ये बुडून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. बाथटबमध्ये बुडून मृ्त्यू झाल्याचं समोर आल्याने तिच्या चाहत्यांनी आणि भारतातील अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. पण परदेशात अशा घटना अनेकदा घडल्याचं समोर आलं आहे. जपान आणि अमेरिकेत अशा घटनांमध्ये काही सेलिब्रिटींचा मृत्यू झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॉप सिंगर विटनी ह्यूस्टन हिची मुलगी बॉबी क्रिस्टीना ब्राऊन हिचा देखील मृत्यू बाथटबमध्ये पडल्याने झाला होता. दारुचं अतिरिक्त सेवन केल्यानं तिचा मृ्त्यू झाल्याचं सांगण्यात येतं.
2012 साली अमेरिकेची प्रसिद्ध पॉप सिंगर विटनी ह्यूस्टनचा मृत्यूदेखील बाथटबमध्ये बुडून झाला होता. अंमली औषधांच्या सेवनाने तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच वेळी ती बाथटबमध्ये पडली. त्यामुळे तिथेच बुडून तिचा मृत्यू झाला.
1970 साली पॅरिसमध्ये जिम मॉरिसन याचा देखील बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. तो एक गायक होता. पण त्याचं शवविच्छेदन झालं नव्हतं. पण असं म्हटलं जातं की, त्याचाही मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे च झाला होता.
श्रीदेवीप्रमाणे परदेशातील काही बड्या सेलिब्रिटींचाही बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. 1960 मध्ये गायक आणि अभिनेत्री जुडी गारलॅण्ड हिचा मृत्यू देखील बाथटबमध्येच झाला होता. जास्त प्रमाणात ड्रग्ज घेतल्याने तिचा बाथटबमध्येच मृत्यू झाला होता.
जपानप्रमाणेच अमेरिकेतही ही प्रमाण अधिक आहे. अमेरिकेने 2006 साली जारी केलेल्या मृत्यूदर आकड्यांमध्ये असं म्हटलं होतं की, दररोज कमीत कमी एका अमेरिकन नागरिकाचा बाथटब, हॉट टब किंवा स्पामध्ये मृत्यू होतो. ज्यापैकी बरेच लोकं हे दारु किंवा अंमली पदार्थाचे सेवन करणारे असतात.
मार्च 2017 मध्ये छापण्यात आलेल्या जनरल ऑफ जनरल फॅमिली अॅण्ड मेडिसीनच्या रिपोर्टनुसार, जपानमध्ये वर्षाला 19 हजार लोकांचा मृत्यू बाथरुममध्ये होणाऱ्या अपघातात होतो. असं म्हटलं आहे. जपानमधील एका एजन्सीने दिलेल्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, मागील 10 वर्षामध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनेत तब्बल 70% वाढ झाली आहे. या घटनेत 10 पैकी 9 व्यक्ती या 65 वर्षाहून अधिक वयाचे आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -