✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

#MeeToo मोहिमेंतर्गत या अभिनेत्रींकडूनही स्वतःवरील लैंगिक अत्याचारांचा खुलासा

एबीपी माझा वेब टीम   |  28 Sep 2018 03:17 PM (IST)
1

नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तिने हा आरोप केला होता. (फोटो : इंस्टाग्राम)

2

अभिनेत्री तनुश्री दत्तानेही अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. 2008 साली हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या शुटिंगवेळी हा प्रकार झाल्याचं ती म्हणाली. (फोटो : इंस्टाग्राम)

3

एकदम नवीन असताना दिग्दर्शक टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून डिनरसाठी परेशान करत होता. तो दिवसा माझा पाठलाग करायचा आणि रात्री फोन करायचा, असं स्वरा म्हणाली होती. (फोटो : इंस्टाग्राम)

4

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत आवाज उठवलेला आहे. 56 दिवसांसाठी एका रिमोट लोकेशनवर शुटिंगसाठी गेलेली असताना हा प्रकार झाल्याचं तिने ‘मुंबई मिरर’शी बोलताना सांगितलं होतं. (फोटो : इंस्टाग्राम)

5

जगभरातील अभिनेते आणि अभिनेत्री स्वतःवर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोलत आहेत. यासाठी सोशल मीडियावर #MeeToo ही मोहिम सुरु आहे. यामध्ये अभिनेत्री सनी लिओनीनेही तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला आहे. (फोटो : इंस्टाग्राम)

6

पहिल्यांदा व्हिडीओ अल्बम शूट करत असताना एक व्यक्ती जवळ आली आणि त्रास देणं सुरु केलं. त्यानंतर त्याची तक्रार निर्माते आणि दिग्दर्शकाकडे केली, असं सनी लिओनीने सांगितलं. (फोटो : इंस्टाग्राम)

7

रिचाने यानंतर सांगितलं, की “मला एका क्षणासाठी खुप वाईट वाटलं, कुणीतरी मूर्ख बनवल्यासारखं वाटलं. पण त्यावेळी करिअरची सुरुवात होती आणि करिअर सोपं होईल, असं वाटलं होतं. पण तो हा मार्ग असू शकत नाही, कारण, अभिनय एक कला आहे.” (फोटो : इंस्टाग्राम)

8

अभिनेत्री रिचा चढ्ढाने द गर्ल ट्राईब या वेब शोमध्ये कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य केलं होतं. आपण अनेकदा कास्टिंक काऊचची शिकार झाल्याचं ती म्हणाली होती. (फोटो : इंस्टाग्राम)

9

त्यापूर्वी त्या अभिनेत्याला कधीही भेटली नव्हते, असंही राधिका म्हणाली. (फोटो : इंस्टाग्राम)

10

दक्षिणेतील एका सुपरस्टारने आपल्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या थोबाडीत मारल्याचा खुलासा अभिनेत्री राधिका आपटेने केला होता. शुटिंगचा पहिलाच दिवस होता. एक प्रसिद्ध अभिनेता जवळ आला आणि त्याने पायाला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न केला. तो स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानतंर मी त्याला थोबाडीत मारली, असं राधिका म्हणाली होती. (फोटो : इंस्टाग्राम)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • #MeeToo मोहिमेंतर्गत या अभिनेत्रींकडूनही स्वतःवरील लैंगिक अत्याचारांचा खुलासा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.