पत्नींना घटस्फोट देऊन कमी वयाच्या तरुणींच्या प्रेमात आकंठ बुडालेले बॉलिवूड स्टार
मागील वर्षी 53 वर्षीय मिलिंद सोमनने 27 वर्षीय अंकिता कोंवर बरोबर विवाह केला आहे.
45 वर्षीय फरहान अख्तर 38 वर्षीय गायिका आणि अभिनेत्री शिबानी डांडेकरसोबत डेट करत आहे. यावर्षी ते दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा आहे. फरहान अख्तरने पत्नी अधुनाला लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट दिला होता.
46 वर्षीय अभिनेता अर्जुन रामपाल 31 वर्षीय साउथ आफ्रिकन मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स सोबत डेट करत आहे. अर्जुनने लग्नानंतर 20 वर्षानंतर पत्नी मेहर जेसियापासून घटस्फोट घेतला.
2015 मध्ये अभिनेत्री काल्कि कोचलीनपासून लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोट घेणारा दिगदर्शक अनुराग कश्यप देखील त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीच्या प्रेमात आहे. 24 वर्षीय शुभ्रा शेट्टी आणि अनुराग बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत.
आपल्या 18 वर्षाच्या लग्नानंतर 51 वर्षीय अरबाज खानने मलायका अरोराला घटस्फोट दिला. आता अरबाज खान आणि 29 वर्षीय जॉर्जिया अँड्रीयानी एकमेकांना डेट करत आहेत.
आपल्या पहिल्या बायकोला वेगवेगळ्या कारणांनी घटस्फोट देऊन बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दुसरे लग्न केले आहे. मात्र काही कलाकार आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या तरुणींच्या प्रेमात आहेत.