या अभिनेत्रींनीही केली होती आत्महत्या?
परवीन बाबी: परवीन बाबी ही ही ग्लॅमसर अभिनेत्री होती. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबत त्यांची जोडी बरीच हिट झाली होती. मात्र, तिनेही आत्महत्या केली. तिचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला होता. काही जणांच्या मते, मधुमेहामुळे तिचा मृत्यू झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिव्या भारती: 90च्या दशकातील एक अशी अभिनेत्री जिनं संपूर्ण तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं होतं. होय... अभिनेत्री दिव्या भारती... वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी तिनं प्रचंड यश संपादन केलं होतं. यावेळी दिव्या नंबर एकची अभिनेत्री होती. मात्र, एवढ्या कमी वयात तिच्या मृत्युच्या बातमीनं सगळेच हैराण झाले होते. दिव्याचा मृत्यू 5 एप्रिल 1993 झाला होता.
सिल्क स्मिता: दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्री सिल्क स्मितानं 23 सप्टेंबर 1996 रोजी चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत सापडली होती. तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. बॉलिवूडमध्ये विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर' सिनेमात सिल्कची भूमिका साकारली होती.
शिखा जोशी: बीए पास सिनेमात छोटीशी भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शिखा जोशीनं मे 2015 साली मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.
जिया खान: या घटनेच्या तीन वर्ष आधी बॉलिवू़डमध्ये अशीच घटना घडली होती. ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्वाला धक्का बसला होता. 3 जून 2013ला अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. जियानं अमिताभ बच्चन यांच्यासह 'नि:शब्द' सिनेमात काम केलं होतं.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बालिका वधूमधील 'आनंदी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्युषानं शुक्रवारी आत्महत्या केली. पण टीव्ही किंवा सिनेजगतातील ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील काही अभिनेत्रींनी असं टोकाचं पाऊल उचललं होतं. पुढच्या स्लाइडवर क्लिक करा आणि पाहा कोण होत्या त्या अभिनेत्री.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -