जीव मुठीत घेऊन पळणाऱ्या नागरिकांच्या घर, ऑफिसवर चोरट्यांचा डल्ला
ज्या क्षणी स्फोट झाला. त्या क्षणी जीव वाचवण्याच्यासाठी अनेकजण आपलं घरदार, ऑफिस सोडून बाहेर पडले.
रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमध्ये झाला नव्हता. अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे. कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतं आहे.
एकीकडे स्फोटात घरदार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या हतबलतेचा फायदा घेणारे चोरटे पाहून असंवेदनशीलतेचं दर्शन घडत आहे.
प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या हदऱ्यानं अनेक दुकानांचं, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
डोंबिवलीच्या प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट झाला आणि संपूर्ण डोंबिवलीत एकच खळबळ माजली. नेमकं झालं तरी काय? हे कळण्यासाठीच बराच वेळ लागला.
त्यामुळं अशा चोरट्यांचा पोलीस बंदोबस्त करणार की नाही? असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे.
डोंबिवलीतल्या स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 हून अधिक घरफोड्यांची नोंद झाल्याचं समजतं आहे.
याचाच फायदा घेत चोरट्यांनी या घरांवर दरोडा टाकायला सुरुवात केली.