वाघांच्या 40 बछड्यांचा मंदिरात मृत्यू
मंदिराच्या कैदेत असलेल्या 40 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यापूर्वी देखील असा काही प्रकार घडला होता का, याचा वन विभागाचे अधिकारी तपास करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाघांना बेशुद्ध करुन पर्यटकांजवळ आणलं जातं. प्राण्यांची तस्करी केल्याचा देखील या मंदिरावर आरोप आहे.
या मंदिराची 2001 मध्ये स्थापना करण्यात आली होती. सुरुवातील या मंदिरात केवळ 7 वाघ होते.
थायलंडमधील कांचानाबुरी प्रांतात हे मंदिर आहे. मंदिर समितीचे पदाधिकारी चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
अधिकाऱ्यांनी इतरही 140 वाघांची सुटका केली.
थायलंडमधील एका मंदिरातील ही घटना आहे. एफे या न्यूज एजंसीनुसार एका ऑनलाईन पोर्टलने ही छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रांवरुन सर्व बछड्यांचा मृत्यू नुकताच झाला असल्याचं दिसत आहे. थायलंडच्या नॅशनल पार्क, प्राणी आणि वनसंवर्धन विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एका मंदिरात वाघांना ठेवण्यात आलं होतं. या मंदिरातील वाघांचे 40 बछडे मृत्यूमुखी पडल्याचं समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -