टेनिसस्टार सेरेनाच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2017 04:47 PM (IST)
1
2
त्यामुळे आता सेरेना वर्षभर तरी टेनिस कोर्टपासून दूर राहणार आहे.
3
लॉस एंजिलिसमध्ये राहणाऱ्या सेरेनाची प्रवक्ता कैली बुश नोव्हाकनं माहिती दिली की, 'मला आनंद आहे की, सेरेना या वर्षाच्या शेवटी आई होणार आहे. त्यामुळे ती या वर्षी खेळू शकणार नाही. पण 2018 साली ती पुन्हा टेनिस कोर्टवर परतेल.'
4
बेबी बंपचा फोटो काढून सेरेनानं स्नॅपचॅटवर शेअर केला होता. पण काही वेळानं तिनं हा फोटो डिलीट करुन टाकला.
5
टेनिस स्टार सेरेना विल्यम्सच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. स्वत: सेरेनानं स्नॅपचॅटवर आपला फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे.
6
मागील वर्षी डिसेंबरमध्ये सेरेनानं एलेक्सिज ओहानियनसोबत साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती.