✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर भारताच्या नावावर 'हे' 7 विक्रम

एबीपी माझा वेब टीम   |  28 Mar 2017 12:57 PM (IST)
1

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

2

साल 2000 नंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी एका सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती.

3

सलामीवीर केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत सहा अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा राहुल पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मुरली विजयने 2014-15 मध्ये केला होता.

4

भारताने मायदेशात खेळलेल्या या मोसमातील 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवला. पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले.

5

धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. या विजयासोबत भारताने अनेक विक्रमही नोंदवले आहेत.

6

मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव होऊनही मालिका जिंकण्याचा विक्रम चौथ्यांदा केला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.

7

फिरकीपटू आर. अश्विनने 2016-17 या मोसमात सर्वाधिक 79 विकेट घेण्याचा विक्रम केला. एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन पहिलाच गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेनच्या 2007-08 साली घेतलेल्या 78 विकेटचा विक्रम मोडीत काढला.

8

चेतेश्वर पुजारा पहिल्यांदाच भारतीय मैदानात शून्यावर बाद झाला. यापूर्वी परदेशात खेळलेल्या 31 कसोटी सामन्यांमध्ये तो दोन वेळा शून्यावर बाद झाला होता.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर भारताच्या नावावर 'हे' 7 विक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.