IND Vs BAN : पिंक बॉलसोबत टीम इंडियाचा कसून सराव; पाहा फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने सांगितले होते की, 'पिंक बॉल तयार करताना त्यावर एक लेअर जास्त असते. मी पिंक बॉलने आतापर्यंत कधीच बॉलिंग केली नाही. फक्त अनेकदा पाहिली आहे. पण मला तेव्हा समजले नाही की, नक्की या बॉलचा रंग पिंक आहे की, ऑरेंज. दरम्यान भारताने इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशच्या संघाला तीनच दिवसात पराभूत केलं होतं. त्यानंतर भारतीय संघ इंदूरमध्येच थांबून पिक बॉलने सराव करत होता.
भारताचे काही खेळाडू, जे याआधी दुलीप करंडकात सहभागी होते. त्यांनी त्यावेळी पिंक बॉलने खेळताना आलेल्या अडथळ्यांबाबत सांगितले होते. या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजाराही होता. या लाइटमध्ये बॉल ऑरेंज रंगाचा दिसतो, असं अनेक खेळाडूंनी सांगितले होते.
डे-नाइट कसोटीमध्ये संध्याकाळी जेव्हा फ्लट लाइट सुरू होते. तेव्हा फलंदाजांना लाइटमुळे खेळण्यास अडथळा निर्माण होत असल्याची चर्चा झाली होती. या 'ट्विलाइट झोन'बाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली होती.
भारतीय क्रिकेट संघ पहिल्या डे-नाइट कसोटीसाठी कसून सराव करत आहे. भारत आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना बांग्लादेश विरूद्ध खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर फ्लाड लाइटमध्ये प्रॅक्टिस केली. भारत आणि बांग्लादेश या दोन टीममध्ये होणारा हा कसोटी सामना ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये शुक्रवर पासून सुरु होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -