टीम इंडियाच्या शिलेदारांची आकर्षक नवी जर्सी, जर्सीवर विश्वचषक विजयांची स्टार प्रतीकं
विराट कोहली आणि त्याचे सहकारी तीच जर्सी परिधान करून हैदराबादच्या मैदानात उतरले होते. इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकातही टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार आहे. या जर्सीवर तीन स्टार दाखवण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या 1983 आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक आणि 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं हे स्टार प्रतीकं आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं या जर्सीचं अनावरण केलं.
ही जर्सी निळ्या रंगाच्या दोन छटांमध्ये आहे. तर नारंगी रंगाचाही वापर या जर्सीमध्ये करण्यात आला आहे. तसेच मागील जर्सीप्रमाणेच ही नवीन जर्सीही पुनर्नवीनीकरण पॉलिस्टरपासून(रिसायकल पॉलिस्टर) तयार करण्यात आली आहे.
इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकातही टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार आहे. या जर्सीवर तीन स्टार दाखवण्यात आले आहेत.
टीम इंडियाच्या शिलेदारांना नवी जर्सी मिळाली, जर्सीवर विश्वचषक विजयांची स्टार प्रतीकं
या अनावरण प्रसंगी माजी कर्णधार एमएस धोनी, कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, भारतीय टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रतिभावान युवा क्रिकेटर पृथ्वी शाॅ आणि महिला संघातील प्रतिभावान युवा क्रिकेटर जेमिमा रोड्रीगेज उपस्थित होते.
मागील विश्वचषकाप्रमाणेच यावेळीही भारतीय संघ विश्वचषकात नवीन जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. nike कंपनी याची मुख्य प्रायोजक असून हैद्राबादमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -