बोट नदीत पलटली, टीम इंडियाचा फलंदाज थोडक्यात बचावला!
कर्नाटकसाठी खेळणारा करुण हा भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात सहभागी होता. तर आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरणमुलाला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली की, बोटीच्या आत टीम इंडियाचा स्टार खेळाडू करुण नायर हा देखील होता.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा करुण नायर केरळमधील अरणमुलाला मंदिरात 'वल्ला साड्या'मध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता.
या बोटीमध्ये भारतीय क्रिकेटर करुण नायरसह 100 जण होते. पण घटनेनंतर तात्काळ बचाव दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि सगळ्यांचा जीव वाचवला.
रविवारी नदीमध्ये नौकानयन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचवेळी अचानक बोट पलटी झाली आणि त्यातील लोक पाण्यामध्ये पडले. ज्यातील दोन जणं अजूनही बेपत्ता आहेत.
केरळमधील पंपा नदीमध्ये बोट पलटली. या बोटीत टीम इंडिया खेळाडूही होता. जो थोडक्यात बचावला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -