वाजवा रे वाजवा... टीम इंडियाचं खास म्युझिक सेशन!
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2016 07:56 PM (IST)
1
ड्रम वाजताना कर्णधार विराट कोहली
2
वसुंधरा यांच्यासोबत भारतीय संघानं मुझ्यिक सेशनची मजा घेतली. याचेच काही खास फोटो बीसीसीआयने अपलोड केले आहेत.
3
या सेशनमध्ये टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील सहभागी झाला होता.
4
टीम इंडियाचा नवा कोच अनिल कुंबळेनं भारतीय संघात नवा जोश भरण्यासाठी अनेक नवनव्या क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. अशीच एक नवी क्लुप्ती काल टीम इंडियाला पाहायला मिळाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि संगीतकार वसुंधरा दास यांच्या ग्रुपने टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत 'ड्रमजॅम' सेशन केलं.