तन्मयनं प्रियंकाची उडवली खिल्ली, प्रियंकानंही दिलं चोख उत्तर!
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 04:04 PM (IST)
1
यानंतर तन्मयनं लागलीच सरेंडरही केलं.
2
ट्विटरवर तन्मयनं प्रियंका चोप्राच्या उच्चाराची खिल्ली उडवली.
3
वादात अडकल्यानंतर तन्मय बरेच दिवस शांत होता. मात्र, आता त्यानं अभिनेत्री प्रियंका चोप्राला डिवचलं आहे.
4
तो व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यानं स्नॅपचॅटचा आधार घेतला होता.
5
वादग्रस्त व्हिडिओ तयार करणारा तन्मय भट्टनं काही दिवसांपूर्वीच वादात अडकला होता. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची त्याने खिल्ली उडवली होती. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती.
6
7
पण हा वाद पुढे वाढू नये यासाठी प्रियंकानं ट्विट केलं की, 'आम्ही दोघं विनोद करत होतो. कॉमेडी हा मनोरंजनाचा सगळ्यात चांगला मार्ग आहे.'
8
प्रियंकानेही ट्विट करुन त्याला चोख उत्तर दिलं. 'काय तुला खरंच तुझ्या उच्चारावर काम करायची गरज आहे?'