एमजी रामचंद्रन ते जयललिता... तामिळनाडूवर डिसेंबरचा 'डाग'
आरजी रामचंद्रनही जयललितांप्रमाणेच दीर्घकाळ आजारी होते.
चेन्नई : डिसेंबर महिना तामिळनाडू राज्यासाठी डाग असल्याचं चित्र आहे. तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचं दीर्घ आजाराने काल रात्री साडे 11 वाजता अपोलो रुग्णालयात निधन झालं. यापूर्वी देखील तामिळनाडुने डिसेंबरमध्ये खूप काही गमावलं आहे.
तामिळनाडुमध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी पोहचवणारी त्सुनामी देखील 2004 मध्ये 26 डिसेंबर रोजी आली होती.
तामिळनाडुने यापूर्वी अनेक दिग्गजांनाही डिसेंबर महिन्यातच गमावलं आहे. जयललिता यांचे राजकीय गुरु आणि एआयएडीएमकेचे संस्थापक आरजी रामचंद्रन यांचं निधन देखील डिसेंबरमध्येच म्हणजे 24 डिसेंबर 1987 रोजी झालं आहे.
'पेरियार' ई. व्ही. रामास्वामी यांचं निधनंही वयाच्या 94 व्या वर्षी 24 डिसेंबर 1973 साली झालं होतं.
डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या वादळी पावसाने चेन्नईसह कांचीपुरम, कडलोर या ठिकाणी मोठी जिवीतहानी झाली होती.
गव्हर्नर सी. राजगोपालाचारी यांचा मृत्यूही 25 डिसेंबर 1972 साली झाला.