जयललितांची प्रकृती चिंताजनक, अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांची गर्दी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या प्रमुख जे जयललिात यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समजताच, चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली.
किडनी, यकृत (लिव्हर) आणि फुप्फुसामध्येही संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना 28 तारखेपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
तसंच ब्लडप्रेशर अनियंत्रित होता. मग त्यांना अन्य अवयवांचाही त्रास होऊ लागला.
या दरम्यान जयललितांना हृदयविक्राराचा सौम्य झटका आला होता. त्यातच त्यांच्या शरिरातील साखरेचं प्रमाण अर्थात शुगर वाढली.
यामध्ये कार्डियोलॉजिस्ट नितीश नाईक, पल्मोनोरोलॉजिस्ट जीसी खिलनानी आणि भूलतज्ज्ञ अंजन त्रिखा यांचा समावेश होता.
23 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयललितांच्या उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालायतील तीन डॉक्टर चेन्नईला पाठवले होते.
प्रकृती अस्वास्थामुळे जयललितांवर गेल्या तीन-चार महिन्यापासून उपचार सुरु आहेत. जयललिता नियमितपणे तपासणीसाठी चेन्नईच्या श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेजमध्ये जात होत्या. त्याबाबतची माहिती कोणालाही दिली नव्हती.
याशिवाय जयललितांचे फॅमिली डॉक्टर शिवकुमार, राज्यपाल आणि अन्य दोघांचा समावेश आहे.
यामध्ये जयललितांच्या जवळच्या सहकारी शशिकलांचाही समावेश आहे. शशिकला जयललितांच्या घरीच राहतात.
जयललिता यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत सावधपणे सर्व हालचाली करण्यात येत आहेत. रुग्णालयात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. केवळ पाच जणांनाच जयललिता अॅडमिट असलेल्या रुममध्ये एण्ट्री आहे.
याशिवाय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्वीट करुन जयललिता यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्राथर्ना केली.
अपोलो हॉस्पिटलमध्ये तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली. अनेक मंत्री आणि आमदार रुग्णालयातच उपस्थित आहे. सर्व खासदारांनी चेन्नईतच राहावं, असा सल्ला पक्षाकडून देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याची चर्चा करुन जयललिता यांच्या तब्येतीची विचारणा केली. तसंच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.
गर्दी लक्षात घेऊन निमलष्करी दलाला तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अपोलो हॉस्पिटलबाहेर 200 अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.