पुणतांब्यातील शेतकरी राज ठाकरेंच्या भेटीला!
दरम्यान बाळा नांदगांवकर यांनीही काही दिवसांपूर्वीच पुणतांब्यात जाऊन संपकरी शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तर राज ठाकरेंनीही शेतकरी संपावर आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्यात मनसे सक्रीय सहभाग घेत असल्याचं दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढवला जाईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच पुणतांब्यातील शेतकरी बांधव मुरलीधर थोरात, बबनराव धनवटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे, गणेश जाधव यांची उपस्थिती होती.
ज्या पुणतांब्यात शेतकरी संपाच्या आंदोलनाला सुरवात झाली, त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं साकडं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी घातलं आहे. त्यामुळे राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतील, अशी शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -