Bikini Climber गिगी वूचा दरीत कोसळून मृत्यू
वाईट हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. अखेर सोमवारी तिचा निष्प्राण देह अधिकाऱ्यांना सापडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपघातानंतर तिने सॅटेलाईट फोनद्वारे मित्रांना आपल्याला दुखापत झाल्याची माहिती दिली होती.
तैवानमधील युशान राष्ट्रीय उद्यानात शनिवारी फोटोशूट करताना तोल जाऊन ती दरीत कोसळली होती.
36 वर्षांच्या गिगीने सोशल मीडियावर 'बिकीनी क्लाईम्बर' अशी ओळख मिळवली होती. पर्वतांच्या माथ्यावर बिकीनी घालून केलेल्या फोटोशूटमुळे गिगीला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली होती.
डोंगरमाथ्यावर बिकीनी घालून फोटोशूट करण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती.
उंच डोंगरकड्यांवर बिकीनी घालून फोटो घेणारी युवती गिगी वूचा दुर्दैवी मृत्यू झाला. तैवानमध्ये खोल दरीत कोसळल्यामुळे गिगीला प्राण गमवावे लागले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -