सुझान खानविरोधात अब्रूनुकसानीचा दावा
सुझानने स्वत:ला आर्किटेक्ट असल्याचं सांगत कंपनीसोबत करार केला होता. पण गोवा प्रोजेक्टचं काम निश्चित काळात पूर्ण केलं नाही. तिचं काम प्रोफेशनल लेव्हलचं नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाआधीच कंपनीने पणजी पोलिसात सुझानविरोधात 1.87 कोटी रुपयांच्या फसवणुकीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
सुझानने मीडियामध्ये दिलेल्या विविध वक्तव्यांचा आधार घेत मुदित गुप्ता यांनी अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणावर आता 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात 15 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. सुझानने आक्षेपार्ह वक्तव्य केल्या आरोप एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर मुदित गुप्ता यांनी केला आहे.
पण आता मुदित गुप्ता यांनी गोवा कोर्टात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केल्याने नवं वळणं मिळालं आहे. दरम्यान सुझानने तिच्यावरील आरोपांचा इन्कार करत ते चुकीचे असल्याचा दावा केला आहे.
या कामासाठी तिला सप्टेंबर 2013 ते फेब्रुवारी 2015 या काळात 1.87 कोटी रुपये दिले होते. सुझानने मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात या आरोपपत्राला आव्हान दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -