✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कोकणातली रानफुलं अन् खडतर जगणं!

एबीपी माझा वेब टीम   |  30 Mar 2017 03:45 PM (IST)
1

पण काम इथं संपत नाही. कारण घरी गेल्यानंतर या नाजूक कळ्यांचा गजरा विणण्याचं महाकठीण काम करावं लागतं. बरं फुलं इतकी नाजूक की त्यांचा गजरा करताना त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपावं लागतं.

2

गजरा माळला की तो हायवेवर जाऊन विकणे आणि त्यातून पैसे मिळवणे हाच यांचा नित्यक्रम. पण गजरा वेळेत विकला नाही तर काही तासात तो कोमेजतोही. निसर्गात रमणारा कोकणी माणूस त्याच निसर्गावर अवलंबून आहे. जितकं खडतर कोकण तितकंच खडतर इथलं जगणं. पण गजऱ्यातल्या फुलांप्रमाणे दुसऱ्यांना आनंद देणारं!

3

मोठ्या मोठ्या फांद्यांवर या कळ्या उगवतात. त्या तोडून आपल्या झोळीत टाकायच्या. अशा किमान तासभर परिश्रमानंतर हा गावरान अत्तराचा सुगंध घेऊन मुली परतीच्या प्रवासाला लागतात.

4

मुळात ही फुलं एका अजस्त्र झाडावर उगवतात. त्या झाडावर या मुली चढाई करतात आणि झाडाच्या टोकावर जाऊन फुलांचा शोध सुरु होतो.

5

भल्या पहाटे 5 वाजता… पहाटेच्या मंद प्रकाशात गावातल्या मुली घनदाट जंगलात जातात. सुरंगी असतेच इतकी सुगंधी की तिचा घमघमाट अख्ख्या जंगलाला सुगंधी करतो. तुमच्या-आमच्या घरातल्या कुंडीत लावलेल्या गुलाबा इतकं सुरंगीची फुलं तोडणं सोपं नसतं.

6

उन्हाळ्यात कोकणातल्या रानावनाला सुगंधी करणारी फुलं बहरतात. ही फुलं तोडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.. याच सुरंगी फुलांवर ‘माझा’चा विशेष रिपोर्ट सुरंगी… तिच्या नावातच सुगंध दरवळतो. कोकणातल्या रानावनाला सुगंधी करणारी ही फुलं उन्हाळा आला की आणखी बहरतात. कोकणात कुठेही फेरफटका मारा, रस्त्याकडेला ही अद्भुत फुलांच्या माळा घेऊन उभ्या पोरी हमखास दिसतात. पण या माळा केसात माळण्यापर्यंतचा प्रवास प्रचंड कठीण आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कोकणातली रानफुलं अन् खडतर जगणं!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.