सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर फडणवीस सरकारकडे आता केवळ दीड दिवस शिल्लक आहे.
आज (26 नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला. तसेच बहुमत चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तापेच उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -