कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारे हे खास पदार्थ!
बदाम: बदामाच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.
सोयाबीन: सोयाबीनच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.
ग्रीन टी: दररोज ग्रीन टी घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास फारच मदत होते.
संत्र्याचा रस: वाढत्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी संत्र्याचा रस फारच उपयुक्त आहे.
दलिया: दररोज एक वाटी दलियाचं सेवन केल्यास त्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
आपल्या आहारात बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.
कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक HDL कोलेस्ट्रॉल आणि दुसरा LDL कोलेस्ट्रॉल. जर LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि लठ्ठपणा यासारख्या गोष्टी होऊ शकतात.
आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असल्यानं त्रस्त आहेत. प्रमाणाबाहेर कोलेस्ट्रॉल वाढल्यानं हृदय रोगाची शक्यता बळावते. पण खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.