उन्हाळी पिकाला पर्याय, उत्पन्नात भर; वाशिममध्ये शेतशिवारात बहरले सूर्यफूल!
भर उन्हाळ्यात इतर वनसंपदा सुकलेल्या स्थितीत दिसत असताना, सूर्यफुलाचे मनमोहक दृश्य वेगळाच आनंद देत आहे. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसद्यस्थितीत पोषक वातावरणामुळे शेत-शिवारात सूर्यफुलाचे पीक डौलात बहरले आहे. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
गेल्या काही दिवसात वाशिममध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता सूर्यफुलाचं पीक घेऊन शेतकरी नवा प्रयोग करत आहेत. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
शेतकऱ्याच्या आर्थिक विकासात भर देणारं पीक म्हणून सूर्यफुलाकडे पाहिलं जात आहे. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
अशातच सूर्यफूल तेलाची मागणी, इतर उन्हाळी पिकाला पर्याय, कमी पाण्यात येणार पीक, वन्यजीव प्राण्याचा धोका कमी आणि उत्पन्नामध्ये जास्त भर देणाऱ्या या पिकाकडे शेतकरी वळले. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता तर रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
वाशिम जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी पिकाला निर्सगाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागले. अशातच उंबरडा बाजारसह 40 एकर परिसरात अनेक शेतकऱ्यांना पर्यायी पीक म्हणून उन्हाळी हंगामात सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. (फोटो -दिगंबर काळेकर, उंबरडा बाजार, वाशिम)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -