62 हजारांच्या आयफोनची 'माती' झाली
उमर हा लंडनमध्ये राहतो. त्याने ही माहिती यासाठी शेअर केली की कुणी यापुढे श्पॉक अॅपवर खरेदी करु फसवणुकीला बळी पडू नये. (फोटो : गुगल फ्री इमेज)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउमरने जेव्हा आयफोनचा बॉक्स उघडला तेव्हा त्याला धक्काच बसला. बॉक्स उघडला तेव्हा त्यामध्ये आयफोनच्या ऐवजी सिमेंट आणि वाळू होती. उमरने जेव्हा जेमी या व्यक्तीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्पॉकवर जेमीचा एक प्रोफाईल फोटो आहे, ज्यामध्ये दोन लहान मुलं असल्याचं दिसून आलं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
उमरने यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हा बॉक्स जप्त केला असून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पोलिसांना सापडू शकला नाही. (फोटो : गुगल फ्री इमेज)
उमरने हा फोटो आपल्या आईला गिफ्ट देण्यासाठी घेतला होता. पण उमरने जेव्हा त्या व्यक्तीला पैसे दिले, तेव्हा त्याने आयफोन तिथेच उघडून पाहिला नाही. (फोटो : गुगल फ्री इमेज)
बूट विक्री श्पॉक या अॅपवरुन उमरने 3 एप्रिल रोजी सेंट्र न्यूकॅसलमधील आपल्या घरी जेमी ए नावाच्या एका व्यक्तीला आयफोनसाठी पैसे दिले. 62 हजार रुपयांची पोचपावती कुरियरने येईल, असं त्या व्यक्तीने सांगितलं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
उमरच्या म्हणण्यानुसार, त्याने जेव्हा आयफोन एक्सचा सेकंड हँड सेल पाहिला तेव्हा त्याला ती ऑफर आवडली. (फोटो : गुगल फ्री इमेज)
सध्या आयफोनच्या बाबतीत जे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ब्रिटनमधील न्यूकॅसल विद्यापीठातील उमर नावाच्या विद्यार्थ्याने एका अशाच प्रकरणाचा खुलासा केला आहे, जेणेकरुन आणखी कुणाला याचा फटका बसू नये. (फोटो : गुगल फ्री इमेज)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -