चिडक्या स्मिथचे आतापर्यंतचे रडीचे डाव
यापूर्वी भारत दौऱ्यावर देखील स्मिथ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. बंगळुरु कसोटीत स्मिथ एका चेंडूवर बाद झाला होता. पण त्यावेळी त्याने डीआरएस घेण्यासाठी आपल्या ड्रेसिंग रुमकडे पाहत डीआरएस घेऊ की नको अशी विचारणा केली होती. नियमाप्रमाणे ड्रेसिंग रुम किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीला खेळाडूला विचारता येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉल टेम्परिंग वादानंतर चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथ याआधीही अनेकदा वादात अडकला आहे.
2016 साली क्राईस्टचर्च कसोटीत पंचांच्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केल्याबद्दल स्मिथला बराच दंड भरावा लागला होता.
स्मिथची तुलना ही डॉन ब्रॅडमनशी करण्यात येते. पण द. आफ्रिकेतील बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर त्याची प्रतिम एवढी मलिन झाली आहे की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याच्याकडून कर्णधारपदच काढून घेतलं आहे.
स्मिथ मैदानात अनेकदा असं विचित्र वर्तन करतो की, ज्यामुळे त्याच्या शानदार कामगिरीवर त्याचा परिणाम होतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -