या भारतीयाची ओकीफला मदत, पुण्यात टीम इंडियाचा पराभव
श्रीधरन हे एक प्रभावी गोलंदाज प्रशिक्षक असल्याचंही ओकीफने सामन्यानंतर सांगितलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीधरन हे 2015 पासून ऑस्ट्रेलियासोबत आहेत. श्रीलंकेविरुद्ध 3-0 ने पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुन्हा श्रीधरन यांना भारताविरुद्ध रणनिती राखण्यासाठी बोलावलं आहे.
ओकीफच नाही तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही श्रीधरन यांचं कौतुक केलं. त्यांनी ओकीफवर चांगली मेहनत घेतली. त्यामुळे तो चांगली गोलंदाजी करत आहे, असं स्मिथ म्हणाला.
पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही श्रीधरन यांनी ओकीफला खेळपट्टीबद्दल काही टीप्स दिल्या होत्या. भारताच्या विकेट्स पडत नाहीत, हे पाहून त्यांनी ओकीफला कानमंत्र दिला.
या विजयात श्रीधरन यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यांना भारतातील परिस्थितीची चांगली जाण आहे, शिवाय त्यांना फलंदाजीचाही चांगला अनुभव आहे, असं ओकीफ म्हणाला.
भारताचे माजी क्रिकेटर आणि ऑस्ट्रेलिया संघाचे गोलंदाजी सल्लागार श्रीधरन श्रीराम यांच्या सल्ल्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अशी कामगिरी करु शकले. श्रीधरन हे भारतातील परिस्थितीची चांगली जाण असणारे खेळाडू समजले जातात.
ओकीफच्या या भेदक गोलंदाजीमागे एका भारतीय क्रिकेटरचा अमूल्य सल्ला आहे.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकीफच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर तब्बल 13 वर्षांनी विजय साजरा केला. ओकीफने या सामन्यात 12 विकेट घेत भारताची फलंदाजी डळमळीत केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -