एटीएममध्ये तरुणावर चाकूहल्ला, थरारक दृश्य CCTVमध्ये कैद
त्यामुळे बँकांनी एटीएम सक्षम आणि सुरक्षित करण्याची गरज आहे. तर लोकांनी एटीएममधून पैसे काढताना, जरा अधिक सावध राहण्याची गरज आहे.
झटपट पैसा कमवण्यासाठी कुणीही कोणत्याही थराला जाऊ शकतं. पण त्यांच्या या अघोरी मार्गात एखाद्या निष्पापाचा जीवही जाऊ शकतो.
जोधपूरमधली ही कहाणी सविस्तर सांगण्याचा उद्देश तुम्हाला सावध करणं हा आहे. कारण असे प्रकार याआधीही घडले आहेत. कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.
अचानक झालेल्या हल्ल्यानं दलपत बिथरला. पण लगेच सावरत त्यानं प्रतिकार केला. दलपतनं आरडाओरडा केल्यानं चोरानं पळ काढला आणि दलपत बचावला.
तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण एटीएमच्या मशीनमधून पैसे लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरामध्ये दलपतसिंह हे एटीएममधून पैसे काढत होते. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ तोंडावर कपडा बांधून एक तरुण एटीएममध्ये शिरला. दलपतसिंह पैसे काढण्यात मग्न असताना या तरुणानं चाकूच्या सहाय्यानं त्यांच्यावर हल्लाबोल केला.
खरं तर याआधीही बंगलोरमधल्या एटीएममध्ये झालेल्या या हल्ल्यानं एटीएमचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पण बँकांनी यातून धडा घेतलेला दिसत नाही. कारण सुरक्षेच्या नावाखाली एटीएममध्ये सीसीटीव्ही व्यतिरिक्त काहीच नाही