PHOTO : श्रीदेवींचं पार्थिव नववधूप्रमाणे सजवलं, अंत्ययात्रेला सुरुवात
नववधू प्रमाणे श्रीदेवीच्या पार्थिवाला सजवण्यात आलं आहे.
बॉलीवूडसह टॉलीवूडचे अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. तर अनेक सेलिब्रेटी अजूनही दाखल होत आहेत.
मुंबईतल्या लोखंडवाला परिसरातल्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
श्रीदेवींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत दाखल झाले आहेत. सेलिब्रेशन हाऊसबाहेर लोकांच्या चार ते साडेचार किलोमीटरपर्यंत रांगा पाहायला मिळत आहेत.
सेलिब्रेशन हाऊसमधून निघून ही अंत्ययात्रा कोकीळाबेन रुग्णालय, जुहू पोलीस स्टेशन मार्गे पार्ल्यातल्या स्मशनानभूमीत दाखल होईल. हेच पाहता सगळ्या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुपारी साडेतीन वाजता पार्ल्यातल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
बॉलीवूडची 'चांदनी' म्हणजेच श्रीदेवींच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये श्रीदेवींचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे.