✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एक रपेट सारंगखेड्याच्या घोडेबाजाराची!

एबीपी माझा वेब टीम   |  22 Dec 2016 07:45 PM (IST)
1

बॉलिवूड आणि घोड्यांचं अतूट नातं आहे. शोलेमधल्या गब्बर सिंगच्या घोडयापासून ते आता सिंग इज ब्लिंग मधल्या अक्षक कुमारच्या टायटल साँगपर्यंत सगळीकडेच घोड्यांची क्रेझ आहे. सिंग इज ब्लिंग मधला हाच घोडा सारंगखेड्याच्या यात्रेत अवतरला आहे.

2

तापीच्या काठावर वसलेली आणि जगभरात आगळं वेगळं स्थान निर्माण केलेली ही यात्रा यापुढेही घोड्यांच्या टापांच्या आवाजात अशीच दुमदुमत राहील हे नक्की.

3

कधीकाळी या बाजाराला प्राणीप्रेमींनी विरोध दर्शवला होता मात्र या यात्रेतून मिळणाऱ्या महसुलामुळे हा विरोध मोडून काढला गेला आणि यात्रा अबाधित राहिली. भविष्यात या भागात पर्यटन स्थळ व्हावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आणि सढळ हस्ते मदतीचा हातही पुढे केलाय. या यात्रेसाठी खास 50 लाख रुपये मंजुर करण्यात आले. भविष्यात जागतिक अश्व संग्रहालय उभारायचं, सह्याद्री सापुता-याच्या घोडेस्वारीची व्यवस्था उभी करुन घोड्यांच्या खेळांचे आयोजन करण्यासारखे कार्यक्रम करण्याचा मनोदय आहे.

4

नोटबंदीचा परिणाम सारंगखेड्याच्या यात्रेवरही झाल्याचा पाहायला मिळतो. दरवर्षी पेक्षा यंदा 70 टक्के व्यवसाय कमी झाल्याच व्यापारी सांगतात. महागडा घोडा खरेदी करायचा तर त्याचा डौलही तसाच राजेशाही हवा. आपल्या लाडक्या घोड्याला सजवण्यासाठी वेगवेगळी आभुषणं खरेदी करायलाही व्यापारी गर्दी करतात.

5

मारवाड, काठेवाडी, पंजाब, मारवाड या भारतीय प्रजातींच्या घोड्यांसाठी सारंगखेडा प्रसिध्द आहे. आजच्या मितीला 10 लाखापासून दीड कोटीपर्यंतचे घोडे तुम्हाला इथे पाहायला मिळतील.. तब्बल दीड कोटींची किम्मत लावली गेलेली पद्मा घोड़ी तर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतेय. आता इतके महागडे घोडे म्हटलं म्हणजे त्यांचा खुराकही तितकाच तगडा. इतक्या महागड्या घोड्यांना सांभाळणं आणि मोठ करणं तितकंच अवघड आहे. 10 लीटर दूध, 40 अंडी आणि काही किलो खाद्य रोज दिल्यावर असे घोड़े आकाराला येतात.

6

सारंगखेड्याच्या यात्रेत फक्त घोड्यांची खरेदी विक्री होत नाही तर घोडेस्वारीचं प्रशिक्षणही दिलं जातं. घोडे कसे सांभाळायचे, चालवायचे, पळवायचे हे सर्व इथे शिकवलं जातं. इथे घोड्यांनाही आणि माणसांनाही प्रशिक्षण दिलं जातं. राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार सह दक्षिणेतूनही अनेक व्यापारी, घोडे शौकीन ग्राहक घोडे खरेदीसाठी सारंगखेड्याला दरवर्षी पिढ्यानपिढ्या नित्यनियमानं येतात.

7

राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा बिहार याचसोबत दक्षिण भारतातूनही इथे घोडे व्यापारी येत असतात, यंदा तर सुमारे साडे तीन हजार घोडे बाजारात दाखल झालेत.

8

सारंगखेडा, घोड्यांच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध ठिकाण. प्रत्येकाची जात वेगळी, प्रत्येकाचा रंग वेगळा आणि प्रत्येकाचा रुबाबही वेगळा. या बाजारात प्रत्येक वर्षी करोडोंची उलाढाल होत असते. तापी नदीच्या काठावर वसलेल्या सारंगखेडा या गावात गेली चारशे वर्ष हा घोड्यांचा बाजार भरतोय. त्यामुळे या बाजाराला त्याचा विशेष असा इतिहासही लाभलाय.

9

वेगवेगळ्या जातीचे, रंगांच, ढंगाचे, इम्पोर्टेड महागडे घोडे पाहायचे असतील, तर तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्यात यावं लागेल. 400 हून अधिक वर्षांची परंपरा असलेली कदाचित भारतातली ही एकमेव घोड्यांची यात्रा आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • एक रपेट सारंगखेड्याच्या घोडेबाजाराची!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.