नागपुरातील मारबत उत्सवाची खास झलक

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरात भोसले राजघराण्यातील इंग्रजांना फितूर झालेली बाकाबाई तर दुसरीकडे श्रीकृष्णला ठार मारण्याचा प्रयत्न करणारी पुतना मावशी अशा मनोवृत्तिचा विरोध म्हणून काळी आणि पिवळी मारबत काडण्यात येते. या उत्सवाला 135 वर्षाची परंपरा आहे.

मारबत ही स्वतंत्रता संग्रामाच्या भावनेशी जुडलेली ऐतिहासिक परंपरा आहे.
रोगराई निवारण, देशात सुख, समृद्धी हे सगळे नेहमीचे विषय यावेळी होते.
नागपूरमध्ये यंदा मोठ्या उत्साहात मारबतचा उत्साह पाहयाला मिळाला. यंदा चीन आणि चिनी वस्तूंचा विरोध करणाऱ्या बडग्याचं आकर्षण होतं.
एकाहून जास्त बडग्यांनी खास चीनशी असलेल्या समस्येला हात घातला, तर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांचं रुपही पाहायला मिळालं. तर विदर्भात असलेल्या विजेच्या प्रश्नावरही बडगा उभारण्यात आला. यात एसएनडीएल कंपनीचा प्रतिकात्मक बडगा पाहायला मिळाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -