नवरात्रौत्सवानिमित्त रखुमाई मारवाडी पोशाखात, तर विठुराया मत्स्यावतारात!
विठुरायाला मस्यावतार करण्यात आला होता. अंगावर हिरव्या रंगाची मखमली अंगी, कमरेला लाल चुटुक धोतर त्यावर सोन्याचा मत्स्य आणि कमरेला भरजरी शेला असा पोशाख करण्यात आला होता.
नवरात्रौत्सवानिमित्त रखुमाई मारवाडी पोशाखात, तर विठुराया मत्स्यावतारात पाहायला मिळाले.
नखशिखांत मारवाडी पद्धतीतील अतिशय मौल्यवान अशा हिरे मोत्याच्या दागिन्याने नटवण्यात आले होते. यात लक्ष्मी हार, चिंचपेटी, हिरे मोत्याच्या माळा, तन्मणी, सोन्याचा कमरपट्टा, कर्णफुले, बिंदी, नथ, ठुशीसह पायात सोन्याचे पैंजण घालण्यात आले आहे. आजचा रुक्मिणी मातेचा हा मारवाडी पोशाख पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी मंदिरात आहे.
विठुरायाच्या मस्तकी सोन्याचा हिरेजडित मुकुट, गळ्यात हिरे मोत्यांच्या माळा अशा आकर्षक पोशाखात विठुरायाचे साजरे रूप अतिशय उठून दिसत आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून आज रुक्मिणी मातेला मारवाडी पोशाखात आणि पारंपरिक दागिन्याने नटवण्यात आले आहे.
रुक्मिणीमातेला आज भरजरी हिरव्या रंगाचा घागरा आणि लाल रंगाच्या चोलीवर लाल रंगाची चुनरी असा देखणा पोशाख परिधान करण्यात आला होता.