वाशिमच्या गणपती मिरवणुकीत एसपी मोक्षदा पाटील!

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे ड्रोनच्या मदतीने मिरवणुकीवर नजर ठेवण्यात आली.
वाशिमच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही ढोल वाजवला.
दुसरीकडे या मिरवणुकीत आकर्षण ठरलं ते शिवशंकर गणेश मंडळांचं ढोल पथक. या ढोलपथकाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी वाशिमकरांनी गर्दी केली होती.
ढोल ताशाच्या गजरात वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात झाली.
खासदार भावना गवळी आणि पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक आणि मानाच्या शिवशंकर गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचं पूजन झालं.
या माहौलमध्ये खासदार भावना गवळी आणि मोक्षदा पाटील यांनीही ढोल वाजवला. सोबतच भावना गवळी यांनी ठेकाही धरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -