सोनम कपूरची पहिली डेट कशी होती? फोटो शेअर
या सुंदर फोटोंसाठी सोनमने वोग इंडिया मासिकाचे आभार मानले आहे.
आनंदला कशी भेटले आणि मग त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं, यासह अनेक गोष्टींचा उलगडला सोनमने मासिकाशी बोलताना केला.
या मासिकाशी बोलताना, सोनमने आनंदसोबतच्या पहिल्या डेटचाही उल्लेख केला आहे. तिने सांगितलं की, आनंदबरोबर पहिल्यांदा डेटवर जाताना मी अतिशय वाईट शूज घातले होते. तरीही आनंद माझ्या प्रेमात पडला. त्याच दिवशी लंडनमध्ये त्याच्याशी बोलताना मला जाणीव झाली की, आनंदच माझं खरं प्रेम आहे.
सोनमच्या लग्नातील काही फोटो वोग मासिकाने आपल्या स्पेशल कव्हरेजसाठी काढले होते. या फोटोंमध्ये सोनम आणि आनंदची जोडी सुंदर तर दिसत आहेच. पण मॅगझिनमध्ये त्यांच्या प्रेमकहाणीचे असे काही किस्से वाचता येणार आहेत, जे आधी कधीही ऐकले नसतील.
हा फोटो वोग इंडिया मासिकाच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध होणार आहे.
बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर उद्योजक आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकली. नववधू सोनमच्या लग्नाचे काही खास फोटो समोर आले आहेत.