कॅन्सरग्रस्त सोनाली बेंद्रेचा ‘न्यू लूक’

सोनाली आपल्या केसांसोबत मजा मस्ती करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

हेयरकट वेळी सोनालीचा नवरा गोल्डी बहलसुद्धा तिच्यासोबत होता.
हेअरकट वेळी सोनाली भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. तेव्हा तिच्या नवऱ्यानेच तिला सावरले.
सोनालीने नवे फोटो आणि व्हिडीओसोबत भावनिक मेसेजसुद्धा दिला आहे. तिच्या या लूकने सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला आहे.
कॅन्सरवरील उपचारावेळी किमोथेरपीदरम्यान केस गळतात. त्यामुळे खबरदारी म्हणून सोनालीने आधीच केस कमी केल्याचं सांगितलं जात आहे.
कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकताच आपला नवीन न्यू लूक शेअर केला. तिने आपल्या लांबसडक केसांना कात्री लावली आहे. सोनालीने त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -