सरप्राईज एलिमेंटसह सोनाक्षीच्या 'अकीरा'चा ट्रेलर रिलीज
या सिनेमात सोनाक्षी सिन्हा, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मासह मराठी कलाकारांचाही भरणा आहे. स्मिता जयकर, अतुल कुलकर्णी, नंदू माधव, लोकेश गुप्ते, उदय सबनीस हे सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
सोनाक्षीला आतापर्यंत ग्लॅमरस किंवा गंभीर व्यक्तिरेखेत पाहिलं आहे. पण 'अकीरा'मध्ये ती गुंड आणि भ्रष्ट पोलिसांना मारहाण करताना दिसेल.
अकीरा हा 'मौना गुरु' या तामीळ चित्रपटाचा रिमेक आहे. 2 सप्टेंबर रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या बहुप्रतिक्षीत 'अकीरा' सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. सोनाक्षी यात स्टंट करताना दिसणार आहे.
सिनेमात सोनाक्षी अकीरा नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे, जी जोधपूरहून मुंबईला शिक्षणासाठी आली आहे.
6 जुलै रोजी रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या 'सुलतान' या चित्रपटाच्या आधी 'अकीरा'चा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे.
पण कॉलेजमधील एका आत्महत्या प्रकरणात तिला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. पण अकीरा सिस्टमविरोधात आणि तिच्याविरोधात कट रचणाऱ्यांचीही धुलाई करते.
आमीर खानचा गजनी आणि अक्षय कुमार हॉलिडे या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शक ए.आर मुरुगदास यांनी 'अकीरा'चं दिग्दर्शन केलं आहे.
एकीकडे सेन्सॉर बोर्डविरोधात लढाई करणारा अनुराग आता सिनेमातही फाईट करताना दिसत आहे.
अकीराच्या ट्रेलरमध्ये एक सरप्राईज एलिमेंटही आहे. हा एलिमेंट म्हणजे अनुराग कश्यप. सिनेमात अनुराग एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारत आहे.