पाच राज्यातील आतापर्यंतचे काही धक्कादायक निकाल
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2017 01:14 PM (IST)
1
यूपीत भाजपनं 300 अधिक जागांवर आघाडीवर आहे.
2
16 वर्ष आंदोलन करणाऱ्या इरोम शर्मिला यांचादेखील मणिपूरमध्ये पराभव झाला. मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती.
3
गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, भाजपचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचाही पराभव झाला आहे.
4
पाच राज्यातील निवडणुकांचे बरेचसे निकाल समोर आले आहेत. त्यामधील काही निकाल धक्कादायक आहेत. उत्तराखंडमध्ये सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. कारण की, मुख्यमंत्री हरीश रावत यांचा दोनही मतदारसंघातून पराभव झाला आहे.
5
यूपीमध्ये अनेक मुस्लीम बहुल भागातही भाजपनं विजय मिळवला आहे.