... आणि चालू सामन्यातच विराटला मैदान सोडावं लागलं!
भारतीय संघात सध्या इंदूरचा, किंवा मध्य प्रदेशचा एकही खेळाडू खेळत नाहीये. पण प्रिन्सच्या रूपाने इंदूरला स्टार फॅन मिळाला आहे.
मैदानावर फलंदाजी करण्याचं सोडून विराट मध्येच प्रेक्षकांमध्ये काय करतोय असा प्रश्न हा फोटो पाहून तुम्हाला पडला असेल. पण हा विराट नसून प्रिन्स बडोनिया असं या दुसऱ्या विराटचं नाव आहे.
विराटसारख्या लूकचा प्रिन्सला कधी फायदाही होतो. इंदूरमध्ये तो कधी शॉपिंगला गेला, तर दुकानदार त्याला डिस्काऊंट देतात. दसऱ्यानिमित्त आयोजित काही कार्यक्रमांचं उदघाटन करण्यासाठीही प्रिन्सला आमंत्रण मिळालंय.
शेवटी प्रिन्सला घरी पाठवण्यात आलं. त्यामुळे तो आपल्या हीरोचं म्हणजे विराटचं द्विशतकही पाहू शकला नाही.
त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी क्रिकेट चाहते गर्दी करताना दिसतात. इंदूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याचाच प्रत्यय आला. प्रिन्सला पाहून चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात होतं.
इंदूरचा रहिवासी असलेला प्रिन्स दिसायला अगदी विराटसारखाच आहे. त्याचंही विराटसारखा यशस्वी क्रिकेटर बनण्याचं स्वप्न आहे. प्रिन्स एक फलंदाज म्हणून कॉलेज स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळला आहे. त्याची सर्वोत्तम खेळी आहे 55 धावांची. पण विराटसारख्या लूकमुळं प्रिन्स इंदूरचा हीरो झाला आहे.