उजनी धरणात समुद्रासारख्या लाटा
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2018 12:57 PM (IST)
1
हे फोटो मुंबईच्या चौपाटीचे नाहीत तर सोलापुरातील उजनी धरणाचे आहेत.
2
हवेचा दाब निर्माण झाल्याने काठोकाठ भरलेल्या धरणात समुद्रासाखऱ्या लाटा उसळत आहेत.
3
या लाटांमुळे सोलापूर-पुण्याला जोडणाऱ्या जुना ब्रिटीशकालीन डिकसळ रेल्वे पुलावरुनही पाणी ओसंडून वाहत आहे.
4
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरलं आहे.
5
धरणातील लाटांचा आनंद लुटण्यासाठी उजनी परिसरातल्या स्थानिकांनी इथे गर्दी केली आहे.
6
परंतु प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत पुलाच्या मध्यभागी न जाण्याचं आवाहन केलं आहे.