या 8 स्मार्टफोनच्या किंमतीत 15 हजारांपर्यंत कपात
लिनोव्हो वाईब S1: या फोनच्या किंमतीमध्ये जवळपास 2 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. सुरुवातीला या फोनची किंमत 15 हजार 999 रुपये होती, आता 12 हजार 999 रुपये आहे. फीचर्सः 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सेल, 1.7GHz ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर, 3 GB रॅम.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसॅमसंग गॅलक्सी S6: हा फोन 49 हजार रुपयांसह लाँच करण्यात आला होता. सध्या या फोनची किंमत 36 हजार रुपये असून यामध्ये जवळपास 13 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे.
वनप्लस X: हा फोन 16 हजार 999 रुपयांसह लाँच करण्यात आला होता. या फोनच्या किंमतीत 4 हजार रुपयांची घट करण्यात आली असून हा फोन 13 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फीचर्सः 5 इंच आकाराची स्क्रिन, 3 GB रॅम, 2.3GHz स्नॅपड्रॅगन क्वाड कोअर प्रोसेसर, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल.
LG Nexus 5x: लाँचिगवेळी या फोनची किंमत 31 हजार 999 रुपये होती. सध्या 21 हजार 999 रुपये किंमत आहे. जवळपास 10 हजार रुपयांची घट झाली आहे.
Moto X Play: या फोनची किंमत 16 हजार 499 रुपये आहे. हा फोन 21 हजार रुपये किंमतीसह लाँच करण्यात आला होता. फीचर्सः 2 GB रॅम, 5.5 इंच स्क्रिन, 1GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर, 21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.
शाओमी Mi 4i: या फोनच्या किंमतीत जवळपास 2 हजार रुपयांची घट झाली आहे. लाँचिंग प्राईस 12 हाजर 999 रुपये होती, सध्याची किंमत 10 हजार 999 रुपये आहे.
Moto X Force: लाँचिंगवेळी या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये होती. आता या फोनची किंमत 34 हजार 999 रुपयांपर्यंत आहे. या फोनमध्ये जवळपास 15 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. फीचर्सः 21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल, 3 GB रॅम, 2Ghz ऑक्टा कोअर प्रोसेसर
HTC Desire 728 ड्युअलः हा फोन बाजारात सध्या 16 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनची किंमत एक हजार रुपयांनी कमी झाली आहे.
मिडबजेट स्मार्टफोन खेरदी करण्याची वाट पाहात असाल तर तुम्ही जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता. अनेक कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -