आमच्या शूर सैन्याला सलाम : अदनान सामी
दरम्यान, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टी चर्चेमुळे सुटू शकतात, त्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचं नुकसान होतं. से नो टू वॉर, असं ट्वीट आफ्रिदीने केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहशतवादाविरुद्ध जबरदस्त, नियोजनपूर्वक आणि यशस्वी कारवाईबद्दल पंतप्रधान मोदी आणि आपल्या शूर भारतीय सैन्याचं खूप खूप अभिनंदन, असं ट्वीट अदनान सामीने केलं आहे.
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. सर्वच राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूंनी सैन्य आणि पंतप्रधानांचं कौतुक करत आभार मानले आहेत. आता त्यात गायक अदनान सामीचाही समावेश झाला आहे.
काही महिन्यांपूर्वीच भारताचा नागरिक झालेला गायक अदनान सामीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याचं अभिनंदन केलं आहे. दहशतवादाविरोधात पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याच्या कामगिरीचं अदनानने कौतुक केलं आहे.
मूळचा पाकिस्तानचा असलेला गायक अदनान सामी 1 जानेवारी 2016 रोजी भारताचा नागरिक बनला आहे. गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी सामीला भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रं दिली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -