PHOTO : सिंधुदुर्गातील श्री कुणकेश्वराच्या चरणी 1001 देवगड हापूस आंब्यांची आरास
कुणकेश्वर एक तिर्थक्षेत्र आणि पर्यटन म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच हे गाव हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. कुणकेश्वर हे एक शिवमंदिर असून छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री कुणकेश्वराला केलेल्या या आरासामधील हापूस आबे कोरोनाशी दोन हात करण्याऱ्या आरोग्य, महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
सुमारे 1001 देवगड हापूस आंब्यांची आरास कुणकेश्वर चरणी केली करण्यात आली. तसेच 101 पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.
सध्या कोकणात आंब्याचा सीजन आहे. मात्र हापूसवर वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती, हवामानाचा परिणाम तसंच देवगड हापूसचे अर्थकारण बदलावं आणि उत्पनात भरभराट व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी देवगड हापूस अर्पण केले आहेत.
यावेळी जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी गाऱ्हाणे मंदिरातील पुजाऱ्यानी श्री देव कुणकेश्वराला घातले
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील कुणकेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात, शंकराची पिंड आणि नंदीला हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -