सिंधुदुर्गमधील सावडाव धबधब्याची नयनरम्य दृश्ये
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढे पाहा, सावडाव धबधब्याची नयनरम्य दृश्ये
त्यामुळे या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे वीकेण्डला गर्दी करतात.
सावडाव धबधबा सुरक्षित समजला जातो. याठिकाणी दगड कोसळण्याचे प्रकार नाहीत तसंच धबधब्याखालील डोह खोल नसल्यामुळे अबालवृद्ध या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात.
गेले दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सावडाव, व्हाहनकोंड हे धबधबे प्रवाहित झाले आहेत.
मान्सूनच्या आगमनाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होतो.
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांना खुणावतात ते कोकणातील धबधबे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून तळकोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
पावसाळी पिकनिकसाठी कोकणात अनेक धबधबे आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेला कणकवलीमधील सावडाव इथला धबधबा रात्री पडलेल्या पावसामुळे प्रवाहित झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -