या टिप्स आजमावल्यास मुलांना चष्मा लागणार नाही!
नोट: कोणत्याही टिप्सची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा पाहायला मिळतो. बदलती जीवनशैली, मोबाईल, व्हिडीओ गेम, लॅपटॉप, टीव्ही यांचा अतिवापर तसंच अन्य कारणांमुळे मुलांची दृष्टी कमी झाली आहे.
सूर्यप्रकाशामुळे मुलांना व्हिटॅमिन डी मिळतो, जे डोळ्यांसाठी उत्तम असतं.
हिवाळ्यात मुलांना सूर्यप्रकाशात खेळू द्या.
आवळ्याचा मुरंबा मुलांच्या डोळ्यासाठी फायदेशीर ठरतो.
मुलांना त्या-त्या हंगामातील फळं खायला देणं आवश्यक आहे. त्यामुळेही दृष्टी चांगली राहते.
चांगल्या डोळ्यांसाठी मुलांना अक्रोड भाजून द्या. तसंच अळशीच्या बियाही उपयुक्त ठरतात.
मुलांचे डोळे चांगले ठेवण्यासाठी त्यांना गाजर, बीट आणि रताळी खायला द्यावी.
दृष्टी चांगली ठेवण्यासाठी भोपळा महत्वाचा आहे.
डोळे हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी ची गरज असते.
टीव्ही आणि मोबाईलसारख्या गॅझेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो.
कमी प्रकाशात, अंधारात वाचण्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.
मुलांची दृष्टी कमी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पौष्टीक अन्नाची कमतरता होय.
लहानग्या वयात मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लागू नये, म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स -
नजर चांगली ठेवण्यासाठी दूध आणि अंडीही महत्त्वाचा पर्याय आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -